चासनळी, हंडेवाडी व कुंभारी येथे विविध विकासकामांचे आमदार काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणाऱ्या रस्ते व विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी देवून त्या समस्या सोडविण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. मतदार संघातील विकास कामांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले असून उर्वरित विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते चासनळी, हंडेवाडी व कुंभारी येथील विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.

यामध्ये कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे २ कोटी रुपये निधीतून मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता डांबरीकरण करणे, तसेच कुंभारी येथे ५० लक्ष रुपये निधीतून श्री राघवेश्वर मंदीर सुशोभीकरण करणे, हंडेवाडी येथे ४० लक्ष रुपये निधीतून रा.मा. ७ हंडेवाडी फाटा ते एकनाथ तिरसे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, ६५ लक्ष रुपये निधीतून भास्कर तिरसे वस्ती ते हंडेवाडी गाव रस्ता डांबरीकरण करणे, २० लक्ष रुपये निधीतून ग्रा.मा. २५ ते वडाची वाडी ते कारवाडी रस्ता डांबरीकरण करणे, आणि चासनळी येथे २ कोटी रुपये निधीतून मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता डांबरीकरण करणे, आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

मतदार संघाचा सर्वांगीण विकास सुरू असून मतदार संघासाठी निधीची ओघ देखील सुरू आहे. त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावात व कोपरगाव शहरात देखील कुठे रस्त्यांची कामे, कुठे शासकीय इमारती, तर कुठे पाणी योजना अशा प्रकारे विविध विकास कामे सर्वत्र सुरू आहेत. कधी न झालेले रस्ते होत असल्यामुळे व आपल्या गावातील देखील रस्ता झाला याचा नागरिकांना आनंद झाला असून गावा गावातील पारावर विकासाच्या चर्चा झडत आहे.

त्यामुळे विकासाच्या बाबतीत चाचपडत असलेल्या मतदार संघाचे चित्र पूर्णपणे बदलले असून मतदार संघातून रुसून गेलेला विकास परत आला असल्याचे जाणवत आहे. सातत्याने सुरू असलेल्या विकास कामांची उद्घाटने सुरू असून अनेक गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहेत. याचा आनंद विरोधकांना देखील झाला असून अनेक विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांना त्या-त्या गावातील विरोधक देखील दबक्या पावलांनी हजर राहत असल्याचे चित्र कोपरगाव मतदार संघात दिसून येत असून त्यांना देखील होत असलेल्या विकासाचा आनंद झाल्याचे जाणवत आहे.

या भूमिपूजन प्रसंगी परमपूज्य श्री राघवेश्वरनंदगिरी महाराज, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्र बर्डे, सचिन चांदगुडे, संचालक श्रीराम राजेभोसले, माजी संचालक मिननाथ बारगळ, भिकाजी सोनवणे, सोमनाथ घुमरे, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलत मोरे, सुभाष कदम, गौतम बँकेचे संचालक श्रीकांत तिरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे, सोशल मीडिया सेलचे सरचिटणीस सुनील गाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील डोंगरे, रामराव साळुंके, सोपान ठाणगे, चंद्रकांत बढे, रविंद्र चिने, लक्ष्मण बढे, अण्णासाहेब बढे, दिगंबर बढे, 

सतिश कदम, सुभाष बढे, किरण बढे, दिनेश साळुंके, प्रभाकर कांगणे, अशोक माळी, भीमराज केदार, ज्ञानेश्वर चांदगुडे, चिंधु गरुड, बाळासाहेब ठाकरे, सोमनाथ सानप, विकास चांदगुडे, गणेश नागरे, गणेश सानप, भागीनाथ धेनक, शरद गरुड, बापू कासोदे, गणेश वराडे, विष्णु चांदगुडे, सोमनाथ कांगणे, सोमनाथ चांदगुडे, पुंडलिक सानप, महेश आहेर, नंदू बोडखे, भास्कर सानप, आण्णाभाऊ कांगणे, बाळासाहेब बारगळ, सुरेश चांदगुडे, मच्छिन्द्र बारगळ, अनिल गाडे, संतोष डोंगरे, कैलास माळी, शंकरराव चांदगुडे, ललित चांदगुडे, सुनील गाडे, मधुकर बारगळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

निवृत्ती घुमरे, अशोक मोरे, सरपंच निवृत्ती सोपान घुमरे, विठ्ठल जामदार, सुभाष शेळके, भाऊसाहेब घुमरे, मारुती आढाव, गणेश घुमरे, पंडित गावंड, कारवाडीचे सरपंच मंगेश लोहकरे, परसराम वालझाडे, सचिन क्षीरसागर, देवराम गावंड, साईनाथ कोकाटे, निलेश बनकर, सचिन गावंड, सोमेश बोरावके, निलेश तिरसे, नवनाथ चव्हाण, नारायण गावंड, भाऊसाहेब चव्हाण, जयवंत कदम, भगीरथ घुमरे, सोमनाथ चांदगुडे, कृष्णा चव्हाण, मच्छिन्द्र वाकचौरे, सोसायटीचे सेक्रेटरी निकम, प्रविण चिने, राजेंद्र वारुळे, 

अरुण कदम, मच्छिन्द्र कदम, ऋषिकेश वारुळे, पुंडलिक थोरात, दिपक ठाणगे, प्रभाकर कदम, सतिश निळकंठ, संतोष मोहरे, गोरख कदम, ऋषिकेश थोरात, अशोक निळकंठ, संजय वारुळे, अनिकेत कदम, दत्तात्रय जिरे, विठ्ठल ठाणगे, सचिन ठाणगे, सुदाम कदम, चंद्रकांत कदम, संजय घुले, भाऊसाहेब वऱ्हे, नवनाथ बढे, यशवंत गायकवाड, धनंजय वारुळे, आकाश कदम, मच्छिन्द्र ठाणगे, बाबासाहेब काशिद, कैलास कबाडी, दत्तात्रय कदम, निलेश कदम, निलेश बढे, सागर कदम, सुनील चंदनशिव, निलेश बढे उपस्थित होते.