श्री रेणुका फाउंडेशनच्या सामाजिक फंडातून अमरधाम सुशोभीकरण

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ : देशातील अग्रगण्य आणि सामाजिक भान जपणाऱ्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को ऑप संस्थेसी सलग्न असणाऱ्या श्री रेणुका माता फाउंडेशनच्या सामाजिक (CSR) फंडाच्या अर्थसहाय्यातून श्री क्षेत्र अमरापूरच्या अमरधामचे सपाटीकरण व सुशोभीकरण करण्यात येत आहे.

श्री रेणुका भक्तानुरगी मंगलताई चंद्रकांत भालेराव यांचे हस्ते नुकताच या कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. आदर्श गावाची वाटचाल करत असलेल्या श्रीक्षेत्र अमरापूरच्या अमरधामच्या परिसरात सर्वत्र मोठमोठे खाचखळगे आहेत. शेवटच्या क्षणी येथील अमरधाम मध्ये थोडावेळ थांबण्याची देखील सुविधा नाही.

सर्वच परिसर उंच सखल मध्येच पाच – सात फुटाचे खड्डे असल्याने या परिसरातील सर्व खड्डे जेसीबी द्वारे बुजवून सपाटीकरण करण्यात येणार आहे. शेवटचा प्रवास सुखद व्हावा असे सुशोभीकरण करून वैकुंठ धामाची निर्मिती करण्यात येणार आहे. स्मशान भूमितील अंतर्गत रस्त्यावर पेविंग ब्लॉक टाकून त्याच्याकडेने शोभेची फुलझाडी लावण्यात येणार आहेत.

तर अन्यत्र सर्वत्र सावलीसाठी मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी भालेराव कुटुंबातील जयंती भालेराव, योगिता भालेराव, सरपंच आशा गरड तसेच बाळासाहेब चौधरी, गणेश शेटे, गणेश  गरड, काकासाहेब म्हस्के, सचिन खैरे, संजय कर्डिले, श्री रेणुका माता देवस्थानचे प्रमुख पुजारी तुषार देवा वैद्य यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.