शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्यातील अमरापूर पासून फर्लांगाच्या अंतरावर नगर रस्त्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास नर जातीचे मृत हरिण आढळून आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील श्री. क्षेत्र मढी येथून दर्शन घेऊन पैठणचे भाविक अरुण कचरु कुंढारे हे त्यांच्या दोन मुलांच्या समवेत पैठण येथे गावी परतत असताना, अमरापुर शिवारातील श्री.रेणुका माता मंदिराजवळ, रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत हरण आढळून आले.
त्यांनी त्या हरणाला घेऊन शेवगाव पोलीस ठाण्यात आणून पोलिसाच्या ताब्यात दिले. त्यानंतर ठाणे अंमलदार अरविंद चव्हाण यांनी तातडीने ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून ते मृत हरीण पाथर्डी विभागाचे वनरक्षक इंद्रभान मारुती चितळे त्यांच्या ताब्यात दिले आहे. हरणाचा कशाने मृत्यू झाला हे मात्र समजू शकले नाही.