‘पास आपल्या शाळेत’ एसटी महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : राज्य परिवहन महामंडळाचा ‘पास आपल्या शाळेत ‘ या स्तुत्य उपक्रमाचा प्रारंभ मंगळवारी (दि. १८) तालुक्यातील ढोरजळगाव येथील  श्रीराम विद्यालयापासून करण्यात आला. ‘अहिल्याबाई होळकर मुलींचे मोफत पास ‘ वाटपाचा शुभारंभ  शेवगांव आगाराचे पालक अधिकारी तथा  विभागीय भांडार अधिकारी संकेत राजहंस  व शेवगाव आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांचे हस्ते करण्यात आला.

        या प्रसंगी आगार व्यवस्थापक कोतकर यांनी एसटी महामंडळामार्फत ५वी ते १२ वी मुलींना मोफत अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास योजना तसेच विद्यार्थ्यांसाठी ६७%  प्रवास सवलत योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन प्रवास करताना विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवासासाठी कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.

विद्यालयाचे प्राचार्य  चेमटे यांनी सर्वांचा सत्कार करून शेवगाव आगाराच्या “पास आपल्या शाळेत” योजनेचे कौतुक केले. शेवगाव आगाराच्या वतीने पास वाटपासाठी सर्व प्रथम श्रीराम विद्यालयाची निवड केल्या बाबत आभार व्यक्त केले. या प्रसंगी आगाराच्या वतीने वाहतूक नियंत्रक  राहुल शेळके व  सचिन राजहंस यांनी विद्यार्थी पास वाटप केले.