शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव विधानसभा मतदार संघात सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याची हॅट्रिक साधल्याबद्दल तालुक्यातील हातगाव येथील स्व. राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळेयांची ‘पेढे तुला करून मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नवनाथ कंगणकर, विष्णू घुले व बाळासाहेब देशमुख या तीन आहनिष्ठावंत कार्यकर्त्यांनी आ. मोनिकाताई राजळे यांच्या पेढेतुल्ला सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी आ. राजळे म्हणाल्या, मी निवडणुकीमध्ये दुसऱ्या – तिसऱ्या क्रमांकावर जाईल असा विरोधकांकडून प्रचार झाला मात्र आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तो खोटा ठरवला असून आपण लवकरच मतदार संघाच्या प्रत्येक गावात आभार दौरा करणार आहे. सोहळ्याच्या प्रारंभी राम मंदिरात आ.राजळेच्या हस्ते अभिषेक केल्यानंतर पेढेतुल्ला करण्यात आली.

यावेळी कांबीचे उपसरपंच सुनिल राजपूत यांनी परिसरातील विज प्रश्नासह इतरही काही प्रश्ना विषयी माहिती दिली. तसेच यावेळी अनेक वक्त्यांनी तालुका पातळीवर भारतीय जनता पक्षाचं सध्या जे नेतृत्व काम पाहत आहे. ते तालुक्यात पक्ष वाढवण्यासाठी कमी पडत असून कोणाचाही नामोल्लेख न करता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाच्याच विरोधात काम केले असल्याने या नेतृत्वात बदल होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी कासम शेख, सुरेश नेमाने, शिवाजी सामीदर, श्रीरंग गोर्डे, संदीप देशमुख, अशोक खिळे, दिलीप विखे, राम केसभट, विष्णू केसभट, अशोक तानवडे, पांडुरंग मिसाळ, उषाताई होळकर, लहू भवर, दिगंबर भवर, राजेंद्र डमाळे,आंबादास ढाकणे, सुगंध खंडागळे, आस्मान घोरतळे, नवनाथ भवर, पांडुरंग तहकीक, बाजीराव लेंडाळ, लक्ष्मण देवढे, शरद चाबुकस्वार, कुद्दूस पठाण, बद्री चेडे, महेश घोरतळे, मन्सूर सय्यद, भागवत केसभट, अविनाश म्हस्के, मधुकर ठुबे, आप्पा भवर, नवनाथ शेळके, अविनाश राजळे, ओंकार केसभट यांचेसह असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. प्रा. भाऊसाहेब मुरकुटे यांनी सुत्र संचलन केले तर बंडू हागे यांनी आभार मानले.
