संजीवनीच्या ८ अभियंत्यांना बेंचमार्क कंपनीत वार्षिक ६ लाखांचे पॅकेज

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ८ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे विविध विभाग आणि ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचा उत्तम समन्वय, तसेच प्रत्येक प्राद्यापक विद्यार्थ्यांना कंपनी निहाय आधुनिक तंत्रज्ञान शिकविण्यासाठी करीत असलेले प्रयत्न, आपल्या विद्यार्थ्याच्या  ज्ञानाच्या कक्षा रूंदविण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठीत व्यासपिठ निर्माण करून देण्यासाठी जगातील नामांकित विद्यापीठांशी केलेले सामंजस्य करार, या सर्व बाबींमधुन संजीवनीचे अभियंते नोकरीसाठी नामांकित कपन्यांच्या कसोटीत उतरत आहे.

अलिकडेच बेंचमार्क आयटी सोल्युशन या कंपनीने घेतलेल्या मुलांखतींमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नालॉजी विभागाच्या आठ अभियंत्यांना प्रत्येकी वार्षिक सहा लाखांचे पॅकेजसह नोकरीचे नेमणुक पत्र दिले आहे, हे यश  म्हणजे संजीवनी ऑटोनॉमस दर्जा असल्याचे फलित आहे, असे अभियांत्रिकी क्षेत्रातील जाणकार सांगतात, अशी माहिती महाविद्यालयांच्या वतीने देण्यात आली आहे.

बेंचमार्क आयटी सोल्युशन या अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनीने मागील वर्षी निकालाच्या अगोदरच संजीवनीच्या बारा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली होती. या बारा अभियंत्यांनी आपल्याला अवगत असलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनीमध्ये उत्तम काम केले. मागील निवड केलेले विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स उत्तम असल्यामुळेच याही वर्षी  कंपनीचे आठ अभियंते निवडले. यात ओम अंबादास बडे, सचिन अनिल बोराडे, गौरी राजेंद्र होले, यशोदीप अरूण कोल्हे, भूषण सुदाम राठोड, अनुष्का बाळासाहेब देवकर, सृष्टी किशोर हिरे व चेतन सतिश  सपकळ यांचा समावेश आहे.

 कोणत्याही पारंपारीक व्यवसायातुन कायम स्वरूपी चांगली कमाई होईलच असे नसते. तसेच एखादे पालक नोकरी करीत असेल, तर त्यांचीही अपेक्षा असते की, आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळुन तो आपल्या महत्वाकांक्षा पुर्ण शकला पाहीजे. त्यांना भविष्यात कोणाकडून आर्थिक मदतीची गरज नाही पडली  पाहीजे. अशा  वेळेला पालक हमखास नोकरी मिळवुन देणारी शिक्षण संस्था शोधतात की जेथे दर्जेदार शिक्षण  मिळेल.

कारण मिळविलेले ज्ञान हे कधिही चोरी जात नाही, उलट त्यात भर पडत असते. अशा वेळेला पालक आपल्यासाठी संजीवनीचा विचार करून संजीवनीवर विश्वास टाकतात. आणि संजीवनीचे सर्व कर्मचारी पालकांच्या पाल्यांना या महाकाय विश्वव्यापी स्पर्धेत व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली आकार देण्याचे काम करीत असतात, याची फल निष्पत्ती  म्हणजे संजीवनीच्या विद्यार्थ्याना मिळत असलेले लाखोंचे पॅकेज.

 संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी  निवड झालेल्या अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर व इतर प्राद्यापक उपस्थित होते.

Leave a Reply