शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अहमदनगर जिल्हा खो-खो संघटना यांच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्टस बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव व जिल्हा मराठा समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार मोनिका ताई राजळे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा दिनांक १३ ते १६ मार्च दरम्यान या भव्य स्पर्धेसाठी खास उभारण्यात आलेल्या किरण कार्तिक क्रीडा नगरीमध्ये होत आहेत. आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होत असून यावेळी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव तथा भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. चंद्रजीत जाधव, खो-खो असोसिएशनेचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सहसचिव मोनिकाताई सावंत इनामदार, युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलंनकर,

प्रांताधिकारी प्रसाद मते, पोलिस उपअधिक्षक सुनील पाटील, तहसीलदार प्रशांत सांगडे, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, ॲड. विश्वासराव आठरे पाटील, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा खो खो संघटना, सचिव रावसाहेब गोपाळ, अशोक पितळे, पंजाबराव आहेर कार्यकारी संचालक पीएमटी शेवगाव शैक्षणिक संकुल, गटविकास अधिकारी अजित बांगर, मुख्याधिकारी विजया घाडगे, संतोष लांडगे, पोनि समाधान नागरे या सर्वांचे उपस्थितीत पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पुरुष व महिला असे ४८ संघातून ७२० खेळाडू, शंभर व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंचमंडळ व तांत्रिक मंडळ व संघटनेचे पदाधिकारी ९० निवड समिती सदस्य व स्वयसेवक असे जवळपास एक हजार प्रत्यक्ष खेळण्यासाठी स्पर्धा पार पाडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अद्यावत मैदाने तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, जवळपास दीड हजार प्रेक्षकांना गॅलरीमध्ये बसून खेळाचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. सकाळी साडे सात ते दहा व सायंकाळच्या सत्रात पाच ते दहा यादोन सत्रामध्ये खेळविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकाश झोताची व्यवस्था केली असून स्पर्धेच दोन वाहिन्या व युट्युबद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील विजयी पुरुष व महिला संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर, प्रियंका इंगळे, तसेच भारताच्या संघातून खेळणारे अनेक पुरुष व महिला खेळाडू आपापल्या जिल्हा संघातून या स्पर्धेसाठी खेळणार आहेत.
या सर्व संघांची चहा नाश्ता दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण राहण्याची व्यवस्था आयोजक मार्फत उत्तम प्रकारे केली आहे.

स्पर्धा उत्तम रित्या पार पाडण्यासाठी आयोजकाकडून डॉ. किरण वाघ, रमेश लव्हाट, निलेश झिरपे, दीपक काटे, विशाल गर्जे, बबन गायकवाड, सचिन वाल्हेकर, विष्णू आधाट, गणेश वावरे, गणेश ढोले, राम छडीदार, सचिन तहकीक, सचिन सातपुते, यांच्यासह अनेक माजी राष्ट्रीय खेळाडू यांचं सहकार्य, तर महेश फलके, गणेश रांधवणे, सागर फडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या स्पर्धेचा भरपूर आनंद शेवगावकरांनी घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
