शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : येथील पैठण रस्त्यावरील स्मशानभूमीतील हातपंप गेली अनेक दिवसापासून बंद पडला होता. या काळात झालेल्या अनेक अंत्यसंस्कार व दशक्रिया विधी करताना नागरिकांची मोठी गैरसोय होत असे. ही अडचण लक्षात घेऊन प्रवीण भारस्कर यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून काल रविवारी ( दि.१५ )त्याची दुरुस्ती स्वखर्चाने केली आहे.
यावेळी स्वतः भारस्कर, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचचे अशोक शिंदे प्रदीप मोहिते, अविनाश तुजारे, शिवाजी काकडे, पत्रकार विठ्ठल मोहिते, बाहदुर मंडलिक, किरण शेरकर, रावसाहेब मंडलिक स्मशानभूमित पंप दुरुस्त होऊन पाणी येण्याची खात्री होईपर्यंत ठाण मांडून होते.
प्रवीण भारस्कर मित्र मंडळ, रामजी कबाड्डी मित्र मंडळ, वस्ताद ग्रुप, भारस्करवाडी मित्र मंडळ, लहुजी ग्रुप, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी भारस्कर यांनी केलेल्या या स्तुत्य कामाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.