शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : शासनाने सुरु केलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुकर झाला आहे. या योजनेअंतर्गत बोधेगाव परिसराला १२ कोटी रुपये उपलब्ध झाल्याने परिसरातील एकूण आठ गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बोधेगावचे उपसरपंच नितीन काकडे यांनी केले आहे.
तालुक्यातील बोधेगाव सह परिसरातील अन्य सात गावाकरिता जलजीवन मिशन योजने अंतर्गत १२ कोटी रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ नुकताच श्री काकडे तसेच ह.भ.प. धोंडीराम महाराज घोरतळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात काकडे बोलत होते.
यावेळी काकडे म्हणाले, या योजनेमध्ये पाईपलाईन, नवीन पाण्याच्या टाक्या, वॉटर फिल्टर, वाल इत्यादींचा समावेश असून या योजनेचा लाभ बोधेगाव, बालमटाकळी ,ठाकूर पिंपळगाव ,दहिगाव शे, राणेगाव, शिंगोरी, अंतरवली शे ( शोभा नगर ), व चापडगाव अशा एकूण आठ गावांना होणार असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून ते पूर्ण होताच त्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री पंकजाताई मुंडे, आ. रामजी शिंदे, आ.सुरेश धस साहेब, खासदार सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे आदिंच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महादेव घोरतळे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड, रमजू पठाण, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मयूर हुंडेकरी, प्रकाश गर्जे, धोंडीराम महाराज घोरतळे, मनोहर घोरतळे, शहादेव गुंजाळ, दिपकराव तागडे, सदाआप्पा शेटे, राजेंद्र डोंगरे, विजय कानडे, ऍड कार्तिक कमाने, सुनील चव्हाण, सोमनाथ गर्जे, भक्तराज घोरतळे, श्रीकांत घोरतळे, सुभाष अकोलकर, रामदास गर्जे, सुरेश पवार, भरत चव्हाण, आदमभाई सय्यद, भाऊसाहेब घोरतळे, माऊली झाम्बरे, रामनाथ ढेसले, नामदेव इलग, अस्मान गर्जे, अमोल मासाळकर यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.