कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव नगरपरिषद मार्फत जागतिक शून्य कचरा दिवस व स्वच्छता उत्सव २०२३ या निमित्ताने जनजागृतीसाठी कोपरगाव नगरपरिषदे मार्फत स्वच्छता जागृती फेरी आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सकाळी साडे दहा वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय आवारात स्वच्छता शपत घेण्यात आली. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी यांच्या समवेत कोपरगाव शहरातून स्वच्छता जागृती फेरी काढण्यात आली. जेणे करून शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती होईल आणि आपले शहर कचरा मुक्त होईल असा प्रामुख्याने उद्देश होता.
तसेच दैनदिन कचरा हा घंटा गाडी मध्ये देतांना तो विलगीकरण करून दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेस या संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल व त्या प्रक्रीये वरचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत देखील जनजागृती व्हावी असाही या रॅलीचा उद्देश होता.
या जागृती फेरीचा आणखी महत्वाचा उद्देश म्हणजे शहरातील महिलांनी शहर स्वच्छते मध्ये उस्फुर्त सहभाग घ्यावा आणि आपले शहर भावीकाळात कचरा मुक्त व्हावे या उद्देशाने शासना मार्फत स्वच्छता उत्सव २०२३ अंतर्गत WINS Award २०२३ हि स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत भाग घेणेसाठी शहरातील महिलांनी एकत्रित अथवा व्ययक्तिक स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला असावा.
शहर स्वच्छतेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल उपलब्ध दस्त ऐवजासह नगरपरिषद कार्यालयात संगणक विभागात उपलब्ध करून दिलेले मोफत अर्ज भरून दिनांक ०५ एप्रिल २०२३ अखेर नगरपरिषद कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. या उपक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.
सदर उपक्रम यशस्वीततेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, स्वच्छता निरीक्षक सुनिल आरण, नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे, शहर समन्वयक स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) प्रविण मोरे, तसेच नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.