कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, तालुका विधी सेवा समिती कोपरगाव व कोपरगाव वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.२८) रोजी सकाळी ९.०० वा. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी कामगारांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश एस.बी. कोऱ्हाळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एम.पी येवले, जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अॅड. ए.एल. वहाडणे, अॅड. एस.एस. धोर्डे, अॅड. व्ही.जी. गवांदे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ, शेतकी अधिकारी कैलास कापसे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा न्यायाधीश कोऱ्हाळे यांनी ऊसतोडणी मंजूर, वाहन चालक, मुकादम यांना मोटार वाहन कायद्यातील तरतूदीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच वाहन चालकांनी ट्रॅक्टर, ट्रक ओव्हर लोडिंग न करणेबाबत सूचना केल्या. तसेच वाहनांना रीफ्लेक्टर लावण्यात यावे. प्रत्येक वाहन चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी मजूर त्यांचे पाल्य, ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी स्वच्छतागृह सुविधा देणेबाबत सूचना केल्या.
तालुका विधी सेवा समिती मार्फत मोफत कायदेशीर मदत व वकिलाची नेमणूक करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या कागद पत्राबाबत अॅड. अशोक वहाडणे यांनी माहिती दिली. तसेच मोटार अपघात दाव्यामध्ये लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची माहिती अॅड. गवांदे यांनी दिली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहन चालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ यांनी केले तर आभार शेतकी अधिकारी कैलास कापसे यांनी मानले.