शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : तालुक्यातील भातकुडगाव फाटा ते दहिगाव ने रस्ता जागोजागी उखडल्याने त्याची मोठी दुर्दशा झाली असून अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाढलेल्या वेड्या बाभळीच्या झाडामुळे या रस्तावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या झाडांमुळे वाहनचालकांना वळणांवर पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नाही.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2021/08/renuka-maltistate-scaled.jpg)
गेल्या काही महिन्यांत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात झाले असून, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने आणि ट्रॅक्टर चालक या मार्गावरून जाताना कायम धोक्यात असतात.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sanjivani.png)
या रस्त्यातील खड्डे त्वरित बुजवावेत जेणेकरून या रस्त्यावरील वाहतूक बिनधोक होईल अशी ठिकठिकाणच्या वळणावरील झाडांची छाटणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा देवटाकळीचे सामाजिक कार्यकर्ते संजय खरड, संदीप ओंबळे, कैलास खरड यांनी दिला आहे.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sona-poly.png)