अश्वमेधचा चीनच्या कंपनी बरोबर कृषी संशोधन आणि सेवा कार्यासाठी सामंजस्य करार – डॉ. वाघचौरे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : आश्वमेध ग्रुप आणि शेंडोंग लुटियन ऑटोमेशन इक्विपमेंट कंपनी लिमिटेड यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला आहे. या कराराचे उद्दिष्ट आहे, “सेंद्रिय खत उत्पादनात यांत्रिकीकरण व मायक्रोबियल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून आशियामधील इनपुट उत्पादकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जलद कंपोस्टिंग तंत्रज्ञान विकसित करणे.

हा करार CAC शांघाय 2025 या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात झाला, डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे, अध्यक्ष – आश्वमेध ग्रुप, यांनी लुटियन कंपनीच्या टीमसोबत भारतातील सेंद्रिय खत उत्पादनात यांत्रिकीकरणाच्या गरजा आणि संधी यावर चर्चा केली. आश्वमेध ग्रुपच्या इतिहासातील आजचा दिवस अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरतो आहे.

लुटियन कंपनी, जी आधीच ६५ देशांमध्ये आपले जाळे निर्माण करून आहे, ती आता आश्वमेध ग्रुपच्या नाविन्यपूर्ण मायक्रोबियल तंत्रज्ञानासोबत काम करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दर्जेदार व जलद उत्पादन साधने उपलब्ध होतील.

या महत्त्वपूर्ण भागीदारीसाठी श्री. झांग बो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच, मिसेस एमिली, कार्यकारी संचालक – सेंद्रिय शेती विभाग, चीन सरकार, यांचे विशेष आभार, ज्यांच्या पाठबळामुळे ह्या दोन संस्था एकत्र येऊ शकल्या.

अम्मा असोसिएशनचे सचिव डॉ. प्रशांत धरनकर यांनी लुटियन कंपनीचे विशेष कौतुक केले आणि या ऐतिहासिक क्षणाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात आश्वमेध ग्रुपच्या संपूर्ण टीमने उत्साहाने सहभाग घेतला आणि हा ऐतिहासिक क्षण मोठ्या आनंदात साजरा केला.

Leave a Reply