कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : पावसाळ्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नामशेष झालेला शंकरनगरला जोडणारा पूल तातडीने बांधावा अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहरात २० ऑक्टोबर २०२२ रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. त्या पावसात शंकरनगर – द्वारकानगरी व ओमनगर – शंकरनगरला जोडणारा पूल नामशेष झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दळणवळनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून नामशेष झालेल्या पुलाच्या जागेवर नविन मजबूत पूल बांधण्यात यावा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. हे निवेदन उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्विकारून नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर पूल बांधण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद प्रयत्न करील असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, संदीप कपिले, राजेंद्र जोशी, सचिन गवारे, कुंडलिक शिरसाठ, माधवराव पोटे, प्रकाश सूर्यवंशी, बाळासाहेब नरवडे, एकनाथ बच्छे, बाळासाहेब शिंदे, अनिरुद्ध काळे, सुनील ढेपले, राजेंद्र ढेपले, माधव पोटे, दशरथ वहाडणे, एकनाथ बच्छे, सदानंद यादव, चांगदेव ढेपले, दिलीप ढेपले, केशव कदम, हामिद शेख, केशव जाधव, अजय धुमाळ, राजेंद्र पोटे, प्रकाश सूर्यवंशी, प्रदीप बागुल, भास्कर घनघाव,
बाळासाहेब नरवडे, सुधाकर बागुल, हर्षल बेलापूरकर, सौ. मंजुश्री शिंदे, बी.टी. बागुल, बी.के. बांडे, कुंडलिक शिरसाठ, बाळासाहेब जाधव, रा.ढ.मोंगाळ, बबन पोटे, सौ. प्रेरणा भातकुडव, तुकाराम भांडकोळी, अण्णासाहेब कासारे, मुन्ना महालकर, शिवाजी बनसोडे, संतोष सोनवणे, पंडित वाघ, अशोक विसपुते, शंकर वानखेडे, अनुराधा पारे, गजानन सोनवणे, हेमंत साबळे, सिताराम झुराळे, सचिन उदावंत, भगवान मोरे, शशिकांत साबळे, भैरवनाथ बारहाते, वाय.एस. माळी, वाय.ओ. चव्हाण, मुरलीधर भालेराव, शिला उबाळे, भाऊसाहेब गंगावणे, भीमराज गंगावणे, सचिन भागवत, सुभाष क्षीरसागर आदी उपस्थित होते.