कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने गेल्यावर्षी एप्रिल २०२२ मध्ये संगीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील वारी येथील नाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून सहा वर्षाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांनी दिली.
यामध्ये प्रारंभिक परीक्षेत गायन या विषयात समीक्षा नेवगे, स्वाती सूर भैय्या, यथार्थ तिवारी, संकेत काळोखे प्रथम तर बासरी या विषयात प्राची निमसे, कीर्ती निमसे, राजलक्ष्मी कासार प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. तसेच हार्मोनियम या विषयात वैष्णवी निमसे, शीला गाडेकर, देवयानी गाढवे तर तबला या विषयात तन्मय पेंडभाजे, कृष्णा कासार, भव्य नकरानी, पायल गोंडे, साईश शिंदे, यश भड(मध्यमा प्रथम) यांनी विशेष योग्यता मिळवून सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.