पदवीधर म्हणुन शिकलेलेच मतदानाला हुकले 

Mypage

कोपरगाव तालुक्यात फक्त ४० टक्के मतदान 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३०:  नाशिक पदवीधर मतदार संघाची विधानपरिषद निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील  केवळ ४०.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माञ बहुतांश पदवीधर शिकलेल्यांनी आपला मतदानाचा हक्क हुकवला आहे. 

Mypage

 तालुक्यात एकुण ८ हजार ४६४ पदवीधर मतदारांची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती. त्यात ५ हजार ७०५ पुरुष तर २ हजार ७५९ स्ञियांचा सामावेश होता. एकुण मतदारांपैकी केवळ ३ हजार ४२० मतदारांनी मतदान केले. त्यात २ हजार ५५४ पुरूष तर केवळ ८६६ स्ञियांनी मतदानाचा हक्क बजावला.

Mypage

लोकशाहीचे बिजे खोलवर रोवण्यासाठी सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेण्याची गरज असते. अनपड, कमी शिकलेल्यांचे प्रबोधन करुन मतदानाचे महत्त्व पटवण्याची खरी जबाबदारी पदवीधर शिकलेल्यांची असताना आज तेच त्यांचा मतदानाच हक्क शंभर टक्के बजावु शकत नसल्याने पदवीधर मतदानाच्या टक्केवारी वरुन जेवढे शिकले त्यापैकी बहुतांश मतदानाला हुकले असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

Mypage

 दरम्यान तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदारांचा सकाळपासून दुपारी २ वाजे पर्यंत उत्साह कमी होता. दुपार नंतर थोडासा वाढला. गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, कृषी अधिकारी मनोज सोनवणे,  यांच्यासह विविध विभागाच्या कार्यालयाचे  अधिकारी, कर्मचारी यांनी विविध  मतदान केंद्रावर तळ ठोकुण होते.

Mypage

पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, दौलतराव जाधव यांनी संपूर्ण शहरासह तालूक्यात चौख बंदोबस्त ठेवला होता. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे होणार असल्याची माहीती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

Mypage

दरम्यान तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, पुष्पाताई काळे, चैताली काळे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र झावरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *