कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. १९ वर्षे वयोगटातील मुलींनी प्रतिस्पर्धी संघाला हरवत अंतिम सामना जिंकल्यामुळे श्रीगणेश चे खेळाडू आता जिल्हास्तरावर १९ वर्षे वयोगटात कबड्डी खेळाचे राहाता तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे यांनी दिली.
शिर्डी व परिसरातील ग्रामीण भागात श्रीगणेश शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना शहरी भागातील क्रीडा सुविधा व शिक्षण देत आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायला हवा. – दिपाली बोडखे, क्रीडा अधिकारी
१९ वर्षे वयोगटातील आदिती डांगे हिच्या नेतृत्वाखाली पूजा चौधरी, ऋषिका भारस्कर,साक्षी गायकवाड, संस्कृती दळवी, सेजल अहिरे, अक्षदा गाडेकर, समृद्धी गुंजाळ, पूजा गव्हाणे, साक्षी शिंदे, मुस्कान मणियार, ऋतुजा जाधव यांनी उच्च प्रतीचा खेळ करत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकली. या संघाने एकूण ३ सामने जिंकत जिल्हास्तरावर आपले प्रतिनिधित्व निश्चित केले. सर्व खेळाडूंचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे, श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक दिलीप दुशिंग यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.