शालेय स्वयंपाकी व मदतनीस संघटनेची कार्यकारिणी जाहीर

समान काम, समान वेतनाची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ :  संपूर्ण भारतामध्ये आज रोजी सर्वात कमी मानधनावर काम करणारे शालेय पोषण आहार योजनेतील शालेय स्वयंपाकी व मदतनीस हे कामगार आहेत. दरमहा त्यांना फक्त अडीच हजार रुपये मानधन मिळते. अशा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या असंघटित कामगारांची सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजूर संघ शालेय स्वयंपाकी व मदतनीस विभाग ही संघटना असून तिची कोपरगाव कार्यकारणी आज जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केले.

 कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष -प्रकाश नामदेव पानपाटील, कार्याध्यक्ष- वाल्मीक पाठक, सरचिटणीस – बाबासाहेब खरे, कोषाध्यक्ष – मोनाली ठाणगे, उपाध्यक्ष -विद्या अभंग, उषाताई रघुवंश, संदीप ठोके, अलका कानडे, प्रसिद्धीप्रमुख – पूजा बोरकर, ज्ञानदेव झिरपे, जिल्हा प्रतिनिधी – शितल गायकवाड, प्रतीक्षा सोनवणे आदींची निवड करण्यात आली.

समान काम समान वेतन यासाठी संघटनेची स्थापना झाली असून शालेय स्वयंपाकी व मदतनीस यांना किमान पंधरा हजार रुपये दरमहा मानधन मिळावे यासाठी आपण लढा देत आहोत असे जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांनी सांगून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. वाल्मीक पाठक यांनी सूत्रसंचालन केले तर विद्या अभंग यांनी आभार मानले. या प्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य शालेय स्वयंपाक किंवा मदतीस कर्मचारी हजर होते.