शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : श्रीक्षेत्र आव्हाने येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती देवस्थानात गुरुवारी संकष्टी चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजिन करण्यात आले. हजारो भाविकांनी दिवसभर बारी लावून दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी सात वाजता गंगेच्या पाण्याने स्नान व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दादासाहेब बोरुडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
त्याचप्रमाणे बोरुडे परिवाराच्या वतीने दुपारी १२ ला फराळ व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी सहा वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज यांचे हरी कीर्तन झाले. शिवाजी एकनाथ आहेर यांच्या हस्ते संध्याकाळची आरती झाल्या नंतर आठ वाजता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. ती आहेर परिवाराने केली.
रात्री दादोबा देव भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम झाला. गणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मालोजी भुसारी, सरचिटणीस अर्जुन सरपते, विश्वस्त अंकुश कळमकर, कारभारी तळेकर, सुधाकर चोथे, नारायण जाधव, रामदास दिवटे, सचिव लक्ष्मण मुटकुळे दिवसभर देवस्थानात थांबून मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांसाठी मदत कार्य करत होते.