व्यवसाय करताना सकारात्मक व हसतमुख रहा – संजय मालपाणी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय, उद्योग करताना सकारात्मक व हसतमुख राहिले पाहिजे. व्यवसाय वृद्धी तुमच्या मागे आपोआप येईल. केवळ लक्ष्मीची पूजा करू नका, तर नारायणाची देखील पूजा करा. कारण लक्ष्मी गिधाडावर बसून येते, तर नारायण गरुडावर स्वार होऊन येतो. मॉलमध्ये येणारा कस्टमर असतो.

तुमच्या दुकानात येणारा ग्राहक असतो, त्यामुळे ‘ग्राहक देवो भव’ या उक्तीप्रमाणे त्यांची सेवा करा. सातत्याने ग्राहकांशी संपर्क व संवाद साधून ग्राहकांना नवनवीन गुणवत्तापूर्ण काय देता येईल. यावर चिंतन केले पाहिजे. कामात अचूकता व टापटीप पणा आणि छोटे-छोटे बदल स्वीकारता आले पाहिजे.

तसेच स्पर्धा करताना एकमेकांची जीव घेणी स्पर्धा करू नका. संवाद फक्त बोलल्यानेच होतो असे नाही, तर ऐकल्याने ही होतो. ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्कीम काढल्या जातात, त्याप्रमाणे दुकानात काम करणाऱ्या कामगारांसाठी ही काढल्या पाहिजे. हसरा चेहरा हे विजयाचे शास्त्र आहे. अशा विविध मुद्द्यांवर प्रसिद्ध व्याख्याते व उद्योजक संजय मालपाणी यांनी मार्गदर्शन केले. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्यावतीने बदलत्या व्यापार पद्धतीबाबत तालुक्यातील व्यापारी बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शनपर सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

व्याख्याते संजय मालपाणी यांचा परिचय व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषविले. कोपरगाव तालुक्याच्या विकासात व्यापारी महासंघाच्या कामकाजाची सविस्तर माहिती सुधीर डागा यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब यांनी केले.  मालपाणी पुढे म्हणाले की, ‘काम, क्रोध, लोभ हे नरकाचे द्वार असून पराक्रम व पुरुषार्थ, मन व बुद्धी, शरीर व श्वास यात समता आली, तरच व्यापारी व ग्राहकांमध्ये एक घट्ट नातं तयार होऊ शकते.

त्यामुळे व्यापाऱ्यांनी सातत्याने स्वतःमध्ये बदल करत राहून आपल्या व्यक्तिमत्वात समता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या अनेक उपक्रमांपासून खूप शिकण्यासारखे आहे. या वेळी व्यापारी महासंघाच्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा उद्योजक संजय मालपाणी यांच्या हस्ते तालुक्याचे आ.आशुतोष काळे व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ग्राहक सन्मान योजनेतील प्रथम विजेते किरण गुरसळ यांना शाईन टू व्हीलर, शुभांगी गुडघे यांना टि.व्ही, दिपाली साबळे यांना लॅपटॉप, निशा दराडे यांना मिक्सर, महेश उगले यांना सुटकेस अशा प्रकारची शेकडो बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली.

व्यापारी महासंघाचे नवनियुक्त संचालक म्हणून गुलशन होडे, महावीर सोनी, संतोष गंगवाल यांनी पदभार स्वीकारला तर बाजार तळ शाखेचे अध्यक्ष आशिष लोढा, कार्याध्यक्ष हर्षल जोशी, उपाध्यक्ष अनिकेत भडकवाडे, सचिव संकेत दरक, शिवाजी रोड व कापड बाजार शाखेचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, उपाध्यक्ष शाम जंगम, सचिव योगेश पवार, स्टॅन्ड परिसर शाखा अध्यक्ष हर्षल कृष्णाने उपाध्यक्ष हर्षद वाणी सचिव शुभम सोनेकर, धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष प्रणव वाणी, उपाध्यक्ष संदीप काबरा, उपाध्यक्ष निलेश जाधव,

सचिव निलेश चुडीवाल, गोदाम गल्ली शाखेचे अध्यक्ष प्रीतेश बंब, उपाध्यक्ष शैलेश ठोळे, खजिनदार देवेश बजाज, सरचिटणीस निरज गोधा, सचिव शाम उपाध्ये, येवला रोड शाखेचे अध्यक्ष आतिष शिंदे, उपाध्यक्ष निकेतन देवकर, उपाध्यक्ष अनुप पटेल, सचिव साईनाथ गोर्डे, मेन रोड व भाजी मार्केट शाखेचे अध्यक्ष नारायण लांडगे, उपाध्यक्ष उल्हास गवारे, उपाध्यक्ष पवन डागा, सचिव मानव शुक्ला, आणि गांधीनगर शाखेचे अध्यक्ष पियुष पापडीवाल, उपाध्यक्ष निलेश काले, उपाध्यक्ष अमोल डा, सचिव प्रथमेश वाणी आदींनी नवनियुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना विवेक कोल्हे म्हणाले की, व्यापार व अध्यात्म असे सुंदर वस्त्र व्यापारी महासंघाच्या माध्यमातून विणले गेले आहे. स्पर्धात्मक युगात बदल करून स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासातही बदल झाला, तर व्यवसायातही बदल होऊन त्यात मोठ्या प्रमाणात वृद्धी होऊ शकते. त्यामुळे आयुष्यात आपल्या व्यक्तिमत्वात वेग-वेगळ्या अंगाने समता आली तर सर्वांगीण विकास होत असतो. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी कोल्हे व काळे यांचा चांगला समतोल घडून आणला आहे.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे महासचिव प्रदीप साखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अजित लोहाडे, उपाध्यक्ष नारायण अग्रवाल, कोषाध्यक्ष तुलसीदास खुबानी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष केशवराव भवर यांनी मानले.