आमदार काळेंनी दिल्या ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : संपूर्ण विश्वाला दया-क्षमा-शांती आणि परोपकाराचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्तांना नमन करून आ.आशुतोष काळे यांनी नाताळ सणानिमित्त कोपरगाव शहरातील होली फॅमिली चर्च, मेथडिस्ट चर्च व डी पॉल चर्चला भेट देऊन ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या देशाची संस्कृती विविधतेने नटलेली असून विविध जाती धर्माच्या सणांची वर्षभर रेलचेल असते. मकर संक्रातीच्या सणापासून तिळगुळाच्या गोडीतून होणारी नवीन वर्षाची सुरुवात त्याप्रमाणे शेवट देखील गोड व्हावा. या उद्देशातून वर्षाच्या शेवटी येणारा नाताळ सण ख्रिश्चन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. आ.आशुतोष काळे दरवर्षी कोपरगाव शहरातील विविध चर्चना भेटी देवून ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देतात.

त्याप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छांचा ख्रिश्चन बांधवांनी स्वीकार करून आ.आशुतोष काळे यांच्या हातून कोपरगाव मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी यासाठी प्रभू येशू चरणी प्रार्थना केली. यावेळी फादर फिलिप अंतोनी, फादर प्रमोद बोधक, फादर जॉमी, फादर जॉय, पास्टर भोसले, सिस्टर मेरी, सिस्टर शांती, सिस्टर बावरा, सिस्टर ग्रेना, सर्जेराव गायकवाड, दिनेश गायकवाड, 

विलास पाटोळे, लता त्रिभुवन, अमोल त्रिभुवन, जिमसन चिरायत, राफी चिरायत, सरीना रॉय, आकाश राफी, अजितजु कसाब, जॉन कदम, रमेश येवले, आदित्य आहिरे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणी अशोक आव्हाटे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, 

विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, शहराध्यक्ष कार्तिक सरदार, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, प्रशांत वाबळे, संदीप कपिले, धनंजय कहार, शैलेश साबळे, गणेश बोरुडे, सचिन गवारे, मनोज नरोडे, एकनाथ गंगूले, राजेंद्र आभाळे, निलेश डांगे, नारायण लांडगे, सागर लकारे, संतोष शेजवळ, विशाल निकम, तेजस साबळे, हर्षल जैस्वाल, पुंडलिक वायखिंडे, सागर महाजन, भोलु शेख,अमित आगलावे, उमेश दिक्षित, मयुर राऊत आदींसह समाज बांधव उपस्थित होते.