१८ जानेवारी रोजी स्वामी मुकूंदानंद सरस्वती महाराजांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ :  तालुक्यातील श्रीक्षेत्र मायगावदेवी येथील गुरूदेव आश्रमात ब्रम्हलिन १००८ परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी मुकूंदानंद सरस्वती महाराज यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होत आहे. 

Mypage

सदर दिवशी सकाळी ७ ते ८ समाधीस्नान, ८ ते ९ पादुकापुजन व सकाळी ९ ते ११ या वेळेत अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र राज्याचे महामंत्री ऋषीकेश येथील ह.भ.प श्री. दिनानाथ महाराज यांचे किर्तन होईल.

tml> Mypage

या कार्यक्रमासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज, राघवेश्वर देवस्थान कुंभारीचे प. पू. राघवेश्वरानंद उंडे महाराज, मायगावदेवी येथील प. पू. विकासगिरी महाराज, पेडगाव पेडसी येथील प. पू. गोविंदपुरीजी महाराज यांच्यासह संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Mypage

या पुण्यतिथी सोहळयात पंचकोशीतील मायगावदेवी, धामोरी, सांगवीभुसार, वेळापूर, मंजुर, कारवाडी, मोर्विस, मढी, चासनळी, सत्यगांव परिसरातील भजनी मंडळी व भाविक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. किर्तनाचा कार्यकम आटोपल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यांत येणार आहे. तरी भाविकांनी या सर्व धार्मीक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मायगावदेवी ग्रामस्थ व गुरूदेव आश्रम विश्वस्तांनी केले आहे.

Mypage