शेवगाव मतदार संघात रस्त्यासाठी १९.४१ कोटी निधी मंजुर – आमदार राजळे

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : शेवगाव पाथर्डी मतदार संघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत २१.५ किलोमीटर रस्त्यांच्या टप्पा दोन अंतर्गत कामासाठी १९ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज गुरुवारी येथे दिली.    यावेळी त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा एक नंतर ग्रामविकास विभागाचे दिनांक २६ सप्टेंबर २०२३चे शासन निर्णयाप्रमाणे मतदारसंघातील प्रमुख सहा रस्त्यांच्या कामाच्या निधीला मंजूरी प्राप्त केली आहे.

Mypage

      महाराष्ट्रात गावे, वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी तसेच दुरावस्था झालेल्या रस्त्याची दर्जोउन्नती करण्यासाठी ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीच्या शासन कालावधीत २८ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांची कामे या योजने अंतर्गत करता आल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

Mypage

     ग्रामविकास विभागाचे दिनांक २६ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे शेवगाव तालुक्यातील रामा ५० हिंगणगाव ते अडभंगीनाथ मंदिर रस्ता मजबूतीकरण, डांबरीकरण करणे,  बऱ्हाणपुर ते चितळी रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण करणे, आखेगाव ते कळसपिंपरी ते तोंडोळी फाटा रस्ता मजबुतीकरण – डांबरीकरण करणे, तर पाथर्डी तालुक्यातील रामा ३६१ ते कीर्तनेवस्ती, वारे वस्ती (मालेवाडी) रस्ता मजबुतीकरण – डांबरीकरण करणे,  रामा ६१ खरवंडी ते काटेवाडी रस्ता मजबुतीकरण – डांबरीकरण करणे,  धामणगाव ते कुरणतांडा रस्ता मजबुतीकरण – डांबरीकरण करणे, या २१ ५ किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभागांतर्गत १९ कोटी ४१  लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.

Mypage

    निधीला मंजुरी दिल्याबद्दल आ . राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *