अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’  पुरस्काराने सन्मानित करावे

शेवगाव प्रतिनिधी, ४ : तालुक्यातील जोहरापूर येथील ग्रामस्थांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘ भारतरत्न’  पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

जोहरापूर येथे १ आॅगस्ट गुरवारी अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सायली सामाजिक प्रतिष्ठानचे  प्रवीण भारस्कर यांच्या हस्ते आंण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जोहरापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा असा ठराव ग्रामस्थांच्या वतीने मांडण्यात आला व तो ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.

यावेळी अण्णाभाऊंच्या अप्रकाशित साहित्य कार्याला उजाळा देण्याचे काम शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष अशोक  शिंदे यांनी केले. नजीक बाभुळगाव चे सरपंच विष्णू घनवट, अभि कब्बाडी, राहुल भारस्कर, बाळू थोरात, किशोर पुजारे, भाऊराव भारस्कर, पोपट भारस्कर, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगडे,  नितीन लांडे, रवींद्र उगलमुगले, ग्रा. सदस्य अनिल आढळगे, अमोल मोहिते, अजय मोहिते, मोहन जाधव, बाबासाहेब जाधव, राजू आढळगे,  माजी सरपंच जालिंदर वाकडे, महादेव उगलमुगले, गांगू भारस्कर तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजू उगलमुगले यांनी केले तर नितीन जाधव यांनी आभारमानले ‌