रामराज्य युवा यात्रेतील पादुकांचे काळे, कोल्हे यांनी केले पुजन
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : संपूर्ण देशभरासह सर्वञ सध्या राम नामाचा महिमा सुरु आहे. त्यामुळे देशात रामराज्य येणार याची चाहुल लागली आहे. असे मत धर्मयोध्दा म्हणून संबोधले जाणारे हिंदू लढ्याचे नेते सुरेश चव्हाणके यांनी कोपरगाव येथील रामराज्य युवा याञेच्यावेळी व्यक्त केले. श्रीलंका ते अयोध्या या दरम्यान प्रभु श्रीरामाने वनवास काळात ज्या-ज्या ठिकाणाहून प्रवास केला होता. त्या-त्या मार्गाने सुरेश चव्हाणके यांचे सुपुत्र व पञकार प्रदोष चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंका ते अयोध्या दरम्यान रामराज्य युवा याञेचे आयोजन करण्यात आले आहे.
या याञेचे कोपरगाव येथे गुरूवारी सकाळी आगमन झाले होते. या याञाचे कोपरगावकरांनी जंगी स्वागत केले. यावेळी आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पादुकांचे पुजन करुन पादूका डोक्यावर घेवून मिरवणुकीत सामील झाले होते. त्यांच्या समवेत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महानंद दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, भारत दूर संचार निगमचे अध्यक्ष रविंद्र बोरावके, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, चेतन खुबानी संतोष गंगवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील विघ्नेश्वर चौकातून पादूका व पालखीची मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. आमदार आशुतोष काळे व स्नेहलला कोल्हे यांनी पादुका डोक्यावर घेवून श्रीरामाचा जयजयकार केला. शहरातील नागरिकांनी मिरवणूक मार्गावर सडा रांगोळ्या काढून स्वागत करीत पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. भगवे ध्वज आणि जय श्रीरामाच्या जयघोषाने कोपरगाव दुमदुमून गेले होते. यावेळी बोलताना सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, रामराज्य युवा याञा हि तब्बल आठ राज्यांतून १० हजार किलोमीटरचा प्रवास करीत २२ जानेवारी रोजी अयोध्येत पोहचणार आहे.
देशातील बहुसंख्य रामभक्तांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. त्यांना प्रभू रामचंद्रांच्या पादुकांचे दर्शन व्हावे म्हणुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदोष चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली रामायण सर्कीटचे अध्यक्ष महंत राम अवतार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही याञा दंडकारण्य मार्गाने या याञेचे आयोजन केले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे, मुलांमध्ये श्रीरामाचे चरित्र निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे असेही ते म्हणाले.
कोपरगाव सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष कृष्णा आढाव, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष रविंद्र पाठक, स्वप्निल निखाडे, मनसेचे संतोष गंगवाल, टेकचंद खुबानी, चेतन खुबानी, विनायक गायकवाड, महेंद्र अमृतकर, सनी वाघ, संजय जगताप, कलविंदर दडियाल, वसंत जाधव, ह.भ.प बाळकृष्ण सुरासे महाराज, मंदार पहाडे, विमल पुंडे, अनिल गायकवाड, सतीश गुजराती, उमा वहाडणे, विजय वडांगळे, योगेश गंगवाल, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगावच्या कार सेवकांचा सन्मान सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते करून ही याञा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.