कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने के.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ‘जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा’ नुकती संपन्न झाली. या स्पर्धेत एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या गणेश
पवार या विद्यार्थ्याने ‘तिरंगा माझी शान’ ही कविता सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला; तर सानिका पांगारकर या विद्यार्थिनीने ‘व्यथा
सैनिकाची’ ही कविता सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
यामुळे या विद्यार्थ्यांना आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय काव्य स्पर्धेत आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. सदर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.आर.आर. सानप यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड. भगिरथ शिंदे, सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षक आणि कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.