‘ब्लड इन नीड’ अभियानात ५५ रक्तदात्यांचे रक्तदान

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने ‘ब्लड ईन नीड’  महा रक्तदान
अभियानान्तर्गत नगर -विळदघाट मधील पद्मश्री डॉ विखे पाटील मेमोरीअल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने येथील जि. प. मराठी शाळेत रविवारी पार पडलेल्या रक्तदान शिबीरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

शेवगाव तालुक्यातील स्व-स्वरूप संप्रदायाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या जन जागृतीमुळे शिबीर यशस्वी झाल्याची माहिती अरविद ठाणगे यांनी दिली. शिबीराचा शुभारंभ भिमराव पाखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निरज लखमवार, जनसंपर्क अधिकारी शुभम नागरे, रामेश्वर जाजू, प्रमोद गोसावी, आरती आगळे, चंद्रकला गोरे, राम शिंगटे, डॉ. सुयोग बाहेती, धनंजय फलके, अजिंक्य लांडे आदिच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.