शोधप्रबंधाचा दर्जा राखण्यासाठी शोधप्रबंधाचे प्लॅजेरिझम करणे गरजेचे – अंकुश कुलकर्णी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : गेल्या वीस वर्षात इतर क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रात देखील झपाट्याने बदल झालेत. या बदलामागे आयटी या टेक्नॉलॉजीची
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : गेल्या वीस वर्षात इतर क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रात देखील झपाट्याने बदल झालेत. या बदलामागे आयटी या टेक्नॉलॉजीची
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ. गणेश चव्हाण
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : बहि:शाल शिक्षण मंडळ- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व के. जे. सोमैया महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब जयकर व यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे वक्ते डॉ. बाबुराव उपाध्ये ‘कवितेच्या गावी जाऊ : आनंदाने न्हाऊ’ या विषयावर बोलताना म्हणाले की “कविता ही आनंदी जीवन जगण्याचे सशक्त माध्यम आहे. कवितेद्वारे समाज-मनातील भाव-भावना तसेच कष्टकऱ्यांचा आवाज, सामाजिक जाणीवा आदींना व्यासपीठ उपलब्ध करून दिला जातो. मी स्वतः जे जीवन जगलो तेच माझ्या कवितेद्वारे शब्दबद्ध करीत गेलो. त्यामुळे माझ्या कवितेत वाचकांना दुःख, व्यथा व कष्टाचे प्रतिबिंब पडलेले अधिक जाणवते. माझी कविता मनोरंजन कमी आणि सर्वसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न अधिक करते. यावेळी डॉ. उपाध्ये यांनी स्वतःच्या निवडक कवितांबरोबरच ग. दि. माडगूळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांनी विविध काव्यग्रंथ आणि प्रासंगिक साहित्य वाचत राहून वाचन संस्कृती टिकवली पाहिजे. त्यातून आपल्याला समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग सापडेल असेही सांगितले. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे वक्ते डॉ. विजयकुमार जोशी ‘हसण्यासाठी टॅक्स नाही’ या विषयावर बोलताना म्हणाले की “सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आपण योग्य आहाराबरोबरच विनोदी वांग्मय देखील वाचले पाहिजे. तसेच खळखळून हसले पाहिजे. हसण्याने हृदयाचा तसेच चेहऱ्यावरील स्नायूंचा व्यायाम होतो आणि मनावरील ताण कमी होतो. आजच्या जागतिकीकरणाच्या आणि धावपळीच्या युगात मनुष्य वाचन आणि हसणे विसरला आहे. त्यामुळेच तो मानसिक ताणाचा बळी ठरला आहे.” याप्रसंगी डॉ. जोशी यांनी अनेक हलकेफुलके किस्से आणि विनोद सांगून विद्यार्थ्यांना मनमुराद हसविले.दोन्ही व्याख्यानमालांचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी भूषविले. प्रास्ताविक आणि अतिथी परिचय केंद्र कार्यवाह डॉ. जे. एस. मोरे व डॉ. एस. बी. दवंगे यांनी करून दिला. दोन्ही व्याख्यानमाले प्रसंगी डॉ. बापूसाहेब भोसले डॉ. गणेश देशमुख यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले तर या व्याख्यानमालांचे सूत्रसंचालन केंद्राचे सदस्य डॉ. आर. ए. जाधव यांनी केले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. एम. बी. खोसे, डॉ. एस. एल. अरगडे, प्रा. वर्षा आहेर, प्रा. श्रद्धा सिनगर, प्रा. घुगे, प्रा. खंडिझोड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर संतोष पगारे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे. प्रोफेसर संतोष पगारे हे मागील २२ वर्षापासून वाणिज्य विभागात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उद्योग, व्यवसाय व शिक्षण क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासामध्ये तसेच नव-नवीन कोर्सेस सूरू करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांचे आत्तापर्यंत ६ पुस्तके व ४७ शोधनिबंध प्रकाशित झालेले असुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण ६० पेक्षाही अधिक चर्चासत्रामध्ये त्यांनी शोध निबंधाचे वाचन व सहभाग नोंदविलेला आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढवा यासाठी त्यांनी ४ पेटेंट प्रकाशित केलेले आहे. मागील काही वर्षांपासून त्यांनी प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून महाविद्यालयातील 600 पेक्षा अधिक विद्यार्थांना मार्गदर्शनाद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील पुणे, नाशिक व नगर या तीनही जिल्ह्यातून निवडणूक प्रक्रियेद्वारे त्यांची मताधिक्काने निवड झाली आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड . संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर-कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर पगारे यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : “समाजाची उंची मोजण्याचा एकमेव मानदंड म्हणजे स्त्रियांचा सन्मान होय. साहित्य हे समाजाची धारणा, दशा आणि
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : येथील के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास दिनांक २८ नोव्हेंबर ते २९
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांची
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगाव येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी चि. तन्मय महाजन याने
Read more