कोल्हे कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी संपन्न 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ४ :  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उसतोडणीसाठी आलेल्या कामगार, महिला व मुले मुली यांचे आरोग्य तपासणी शिबीर बुधवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संचालक बापूराव बारहाते व संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. 

             प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वंचित उपेक्षीतांच्या जीवनांत सातत्याने आनंद निर्माण करून गेल्या ६३ वर्षापासुन कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगारांची मोफत आरोग्य तपासणी उपक्रम हाती घेत त्यातुन अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपुर्ण मतदार संघात मोफत सर्वरोग निदान, डोळे तपासणी, मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीरासारखे स्तुत्य उपक्रम राबवुन सामाजिक कार्यात योगदान देत आहेत.

           संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिकेत खोत, स्त्री रोग तज्ञ डॉ. मंजुषा गायकवाड, डॉ. प्रियंका मुळे, शिंगणापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कृष्णा पवार यांनी लसीकरण, आहार, व्यायाम यासह नियीमत आरोग्य तपासणीचे फायदे काय आहेत याबाबत प्रबोधन करून जागतिक नेत्रदान दिनाचे महत्व विषद केले. उसतोडणी कामगारांना शारीरीक कष्ट असल्यांने त्यांनी आहार आरोग्य तपासणी नियमित करावी. गोवर रूबेलाची साथ सध्या सुरू असून लहान मुलांची काळजी घेवुन त्यांचे वेळीच लसीकरण करावे असे सांगितले. किरकोळ थंडी तपाची कणकण जाणवली तर लगेच दवाखान्यात जावे.

          केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आभार कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांनी केले.