शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. शेवगाव नगरपरिषद, पंचायत समिती, विविध शैक्षणिक संस्थामध्ये तसेच येथील क्रान्ती चौकात ग्रामस्थांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली आहे.
क्रान्ती चौकात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांच्या नावांचा जय घोष करण्यात येऊन, अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव संजय नांगरे म्हणाले, सावित्रीबाईनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु करुन सर्व स्त्रियांचे अंधकारमय जीवन शिक्षणरुपी ज्योतीने प्रकाशमान करण्याचे काम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले.
शेणा दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्य धर्म पुढे नेण्याची वाट त्या चालत राहिल्या म्हणूनच आज आपली प्रशस्त वाट तयार झाली. या वाटेवरून चालतांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण जागवायलाच हवी.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव सुभाष लांडे, पवनकुमार साळवे, शेखर तिजोरे, डॉ. मेघा कांबळे, आदर्श कन्या विद्या मंदिराच्या सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी तसेच अड.कारभारी गलांडे, खंडूभाऊ बुलबुले, गणेश रांधवणे, बाळासाहेब डाके, शिवा आधाट, गोरख नांगरे, सागर आधाट, अनिकेत डाके, सोमनाथ नाईक, प्रतिक लबडे, अर्जुन गुजर, मच्छिंद्र डाके, मच्छिंद्र देहाडराय, संतोष सुसे, सचिन आधाट, अनिल इंगळे, रमेश डाके, शेख प्यारेलाल, दीपक भडके, पो.कॉ.पालवे, गणेश डोमकावळे, डॉ.सोमनाथ आधाट आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.