कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उस उत्पादक सभासद शेतक-यांच्या उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी अत्याधूनिक तंत्रज्ञानातून अंमलबजावणी केली असुन उस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी कारखान्याने स्वत: सेंद्रीय खताची निर्मीती केली असुन त्याचा पॅकींग मशीनचा शुभारंभ गणेश जयंतीच्या मुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी करण्यांत आला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक केले. उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याच्या उपक्रमाची माहिती दिली. उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी सेंद्रीय खत निर्मिती उत्पादनाची माहिती दिली. संचालक बापूसाहेब बारहाते व सौ. संगिता बारहाते यांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यांत आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, कारखान्यांचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, मनेष गाडे, सतिष आव्हाड, बाळासाहेब पानगव्हाणे, विलास माळी, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, उस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. शेतकरी सभासदांनी दर्जेदार उस बेणे निवडुन प्रती एकरी उस उत्पादनात वाढ करावी त्याकरीता संजीवनी सेंद्रीय खताचा वापर करावा, कंपोष्ट पासुन बनविण्यांत येत असलेल्या सेंद्रीय खताचे सुरू करणेत येत असलेल्या मशिनचा वापर दिवसातील तीनही शिफट करून जास्तीत जास्त सेंद्रीय खत तयार करावे. तयार झालेले सेंद्रीय खत उस पिकाबरोबरच इतरही पिकांना मागणीनुसार देणेत यावे.
कार्यक्षेत्रातील उस उत्पादकांसाठी सवलतीच्या दरात सेंद्रीय खत पुरविण्यांत नेईल. सदरचे सेंद्रीय खताचा दर्जा, गुणवत्ता टिकविल्यामुळे सभासद शेतक-यांच्या अधिक पसंतीस संजीवनी सेंद्रीय खत उतरले आहे. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.