कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव शहरातील संजयनगर व हनुमान नगरमधील बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या बालकांच्या कुटुंबांना आ.आशुतोष काळे यांच्याकडून नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली आहे.
कोपरगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी या भटक्या कुत्र्यांनी कोपरगाव शहरातील संजयनगरच्या आयेशा कॉलनीतील हमजा जावेद अत्तार (वय वर्ष०३) व हनुमान नगरमधील फैजल मोसीन शेख (वय वर्ष ०४) या बालकांवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले असून या बालकांच्या तब्बेतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली व आपल्या कार्यकर्त्यांमार्फत या बालकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, हाजी मेहमूद सय्यद, दिनकर खरे, राजेंद्र वाघचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, इम्तियाज अत्तार, शफिक शेख आदी उपस्थित होते.
गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी या जखमी बालकांच्या त्यांच्या कुटुंबाकडून तब्बेतीची चौकशी जाणून घेतली. पुढील उपचारासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तातडीने जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यास जखमी बालकांच्या पालकांना सांगितले आहे.