यश म्हणजे भाग्य आणि परीश्रम यांचा गुणाकार – डॉ. गोविंद पांडे

 संजीवनी फार्मसी प्रथम वर्ष  स्वागत समारंभ संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : ‘अंध व दिव्यांग व्यक्ती ज्यांना इतरांचा भार म्हणुन हिणवले जाते, परंतु अशा व्यक्तीही परीश्रमाच्या जोरावर यशस्वी होवुन इतरांचा आधार बनलेली अनेक उदाहरणे आहेत. अशा व्यक्तींनी यशस्वी बनुन डोळसांच्याही डोळ्यात अंजन घातले आहे. परमेश्वराने आपल्याला सर्व अवयव पुर्ण क्षमतेचे दिले आहे. म्हणुन आपले भाग्य चांगले आहे. त्यामुळे आपण यश  मिळविलेच पाहीजे. त्यासाठी परीश्रम करणे महत्वाचे आहे कारण यश हे भाग्य आणि परीश्रम यांचा गुणाकार आहे’, असे प्रतिपादन कोप्रान लिमिटेड, मुंबई कंपनीचे डायरेक्टर डॉ. गोविंद पांडे यांनी केले.

 संजीवनी बी. फार्मसी व एम. फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या दुसऱ्या ऑटोनॉमस बॅचच्या स्वागत समारंभात विध्यार्थी व पालकांच्या मेळाव्यात डॉ. पांडे प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते. सजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीट्युटसचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. सरीता पवार उपस्थित होते. विध्यार्थी व पालकांची संख्या उल्लेखनिय होती.

           प्रारंभी डॉ. पवार यांनी कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट  करीत सर्वांचे स्वागत केले व सर्व विध्यार्थ्यांचे देशातील पहिल्या १२ महाविद्यालयाच्या क्रमवारीत असलेल्या संजीवनी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश  मिळाल्याबध्दल अभिनंदनही केले. डॉ. पटेल यांनी संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने मागील कार्यकाळात वेगवेगळ्या  पातळीवर स्थापित केलेले कीर्तिमान सांगत संजीवनी महाविद्यालय इतर महाविद्यालयांपेक्षा कसे उत्कृष्ट आहे, हे अधोरेखित केले.

  डॉ. पांडे पुढे म्हणाले की, पुर्वी औषध बनविणाऱ्या  कंपन्यांमध्ये महाराष्ट्र  राज्य, विशेषकरून  मुंबई देशात आघाडीवर होते. परंतु आता संपुर्ण देश औषध कंपन्यांमध्ये आघाडीवर आहे. भारत देश जगातील २०० देशांना औषधे पुरवितो. फार्मसी शिक्षण घेणाऱ्या  विध्यार्थ्यांनी नोकरीची चिंता करूच नये असे सांगत फार्मसी शिक्षण पुर्ण केल्यावर कोठे नोकऱ्या  मिळु शकतात, अथवा कसा स्वतःचा व्यवसाय करू शकतात, असे १८ ते १९ पर्याय सांगीतले. मात्र प्रामाणिकपणे शिक्षण  घेवुन प्रगती करीत रहा असे सांगीतले.

जगण्यासाठी पैसा लागतो, परंतु पैसा सर्वस्व नसतो. पैशाच्या मागे न धावता प्रामाणिकपणे ज्ञान मिळवुन कामात सातत्य ठेवले तर पैसा आपल्या मागे धावेल असे सांगुन ते म्हणाले की आहे त्या नोकरीच्या अथवा उद्योगाच्या अवस्थेमधुन पुढे जाण्याचा मार्ग निवडताना नियोजन आणि योग्य गणित करून पुढे जा, म्हणजे धोका संभावणारच नाही. आपल्या करीअरची सुरूवात किती आर्थिक प्राप्तीने होते याचा विचार न करता आपल्या कर्तृत्वामधुन यश  संपादन करा.

         अध्यक्ष स्थानावरून बोलताना अमित कोल्हे म्हणाले की संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे हे वयाच्या ९४ वर्षापर्यंत  महाविद्यालयात येवुन प्रकल्प आधारीत शिक्षण देण्याचा आग्रह करायचे. या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उद्योगाभिमुख फार्मासिस्ट्स तयार करण्याच्या हेतुने मागील वर्षापासून ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला. यामुळे आधुनिक पध्दती व अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. स्व. कोल्हे यांचा आग्रह असायचाकी विध्यार्थ्याला एकतर संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या मार्फत चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली पाहीजे, नाहीतर त्याने स्वतःचा उद्योग सुरू केला पाहीजे किंवा तो उच्च शिक्षणासाठी गेला पाहीजे. या त्रीसुत्रीवर संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  वाटचाल चालु असुन विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले.