कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे शुक्रवार (दि.२३) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करून नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारला उद्देशून केलेले वक्तव्य विधानसभा अध्यक्षांना जोडून करण्यात आलेली अन्यायकारक निलंबनाची कारवाई विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, राज्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात राज्याच्या जनतेच्या अतिशय महत्वाच्या विषयाला वाचा फोडून सरकारला धारेवर धरले. सीमा प्रश्न, राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती, अतिवृष्टी नुकसान भरपाई आदी विषयांना हात घातला.
त्यावेळी सरकारला घेरले जाण्याच्या भीतीपोटी अभ्यासू व्यक्तींना बाजूला ठेवण्याच्या उद्देशातून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांना हिवाळी अधिवेशनात मुंबई व नागपूर विधानभवन परिसरात प्रवेशावर घालण्यात आलेली बंदी सूडबुद्धीचे राजकारण आहे. हे लोकशाहीसाठी हानीकारक असून या प्रवृत्तीचा निषेध करीत असून त्यांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे अशी मागणी नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी कारभारी आगवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रावण आसणे, शिवाजी घुले, सुनील मांजरे, मनोज जगझाप, दिनार कुदळे, विष्णु शिंदे, माजी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, सदस्य मधुकर टेके, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, दिनकर खरे, फकीर कुरेशी, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, सांडूभाई पठाण,
देवेन रोहमारे, रामदास केकाण, संदीप कपिले, धनंजय कहार, वाल्मीक लहिरे, अशोक आव्हाटे, इम्तियाजअत्तार, राजेंद्र आभाळे, आकाश डागा, विजय नागरे, शुभम लासुरे, किशोर डोखे, सागर लकारे, मुकुंद इंगळे, संतोष दळवी, नितीन शेलार, चांदभाई पठाण, ऋषिकेश खैरनार, प्रशांत वाबळे, अक्षय आंग्रे, एकनाथ गंगूले, राजेंद्र खैरनार, शैलेश साबळे, समीर वर्पे, संदीप आरगडे, बाळासाहेब पवार, रावसाहेब चौधरी, चांगदेव बारहाते, भाऊसाहेब भाबड, विक्रम बाचकर, शिवाजी बाचकर, विलास चव्हाण, सुधाकर वादे, अजित सिनगर, राहुल जगधने, भास्करराव आदमाने, दिनेश साळुंके, पांडुरंग कुदळे, अशोक मलिक, नानासाहेब चौधरी, अजय पवार, अमन घनगाव, निकेश घनघाव, राजेश घनगाव,
किरण घनघाव, मिथुन गायकवाड, बाळासाहेब सिनगर, दत्तात्रय सिनगर, विलास पाटोळे, राहुल चवंडके, शंकर घोडेराव, अय्युब कच्छी, रोशन खैरनार, किरण बागुल, आकाश गायकवाड, राहुल राठोड, परवेज शेख, सुरेश सोनटक्के, नितीन शिंदे, बाळासाहेब दहे, प्रदीप कुऱ्हाडे, गोरख कानडे, दिनेश संत, हर्षल जैस्वाल, सिद्धेश होले, रिंकेश खडांगळे, जयहरी वाघ, गणेश लकारे, गणेश बोरुडे, समर्थ दीक्षित, संजय कट्टे, राणी बोर्डे, सविता भोसले, भाग्यश्री बोरुडे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.