रामचंद्र थोरात पाटील यांचे निधन

श्रीरामपूर प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्यातील उक्कलगाव येथील हरिहर एकता महाआघाडीचे अध्यक्ष तथा उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रामचंद्र गंगाधर थोरात पाटील ( वय ७८ ) यांचे गुरुवारी (दि. १२ ) पहाटे साडेपाचला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचे पार्थिवावर प्रवरा तिरी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

       यावेळी सुरेश पाटील थोरात यांनी उक्कल गाव ग्रामस्थांच्या वतीने, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक रावसाहेब पाटील थोरात यांनी अशोक उद्योग समुहाच्या वतीने तसेच प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जनार्दन घोरपडे यांनी प्रवरा परिसर तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीने थोरात यांना श्रध्दांजली वाहिली.

       कै. रामचंद्र थोरात स्थानिक राजकारणात किंगमेकर राहिले आहेत, अलिकडे मात्र त्यांनी राजकीय
निवृत्ती घेतली होती. ते मितभाषी, धार्मिक प्रवृत्तीचे, अडचणीच्या काळात कोणाच्याही मदतीस धावून जाणारे आधारवड होते.

       त्यांच्या मागे पत्नी, अनिल, सुनिल, सुभाष व सतिश ही चार मुले, एक भाऊ, वाहिनी, पाच विवाहित बहिणी, मेव्हणे, सुना, पुतणे , नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोणीच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य दत्तात्रय थोरात यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.