कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेल्या कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ५ मधील ‘वेस’ ची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून या ‘वेस’ चे कोपरगाव नगरपरिषदेने शिवकालीन पद्धतीचे बांधकाम करून नुतनीकरण करावे. अशी मागणी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ५ मध्ये कोपरगाव शहरातील मानाची व धार्मिक महत्व असलेल्या पुरातन ‘वेस’ ची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी या वेसचे शिवकालीन पद्धतीचे बांधकाम करण्यात यावे अशी प्रभाग ५ मधील नागरिकांची मागणी आहे. त्या मागणीचा विचार करून तातडीने या ‘वेस’ चे काम सुरु करावे असे म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, बाळासाहेब रुईकर, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, ऋषिकेश खैरनार, एकनाथ गंगूले, महेश उदावंत, संतोष शेलार, चांदभाई पठाण, विलास आव्हाड, अय्युब कच्छी, नितीन शिंदे, गणेश लकारे, सुरेंद्र सोनटक्के, संदीप सावतडकर, संदीप देवळालीकर, शिवा लकारे, अमोल आढाव, मुकुंद भुतडा, समर्थ दीक्षित, अमोल देवकर, अनिरुद्ध काळे आदी उपस्थित होते.